Anuradha Vipat
दिवाळीचा फराळ तळताना अनेकदा तेलात पिठाचे कण सुटतात, मसाला जळतो किंवा तेल काळपट आणि चिकट होते.
असे खराब झालेले तेल आरोग्यासाठी अपायकारक असते आणि त्यात तळलेल्या पुढच्या फराळाची चवही बिघडते.
फराळ तळताना तेल स्वच्छ, हलके आणि दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या.
शंकरपाळी, करंजी किंवा मटरी तेलात सोडण्यापूर्वी त्यांना चाळणीत ठेवून थोडे चाळून घ्या किंवा जास्तीचे सुके पीठ झटकून घ्या.
तेल कधीही धूर येईपर्यंत अतिशय कडक गरम करू नका. फराळ नेहमी मध्यम आचेवर तळा.
चिवड्यासाठी कढीपत्ता, मिरच्या, खोबऱ्याचे तुकडे किंवा शेंगदाणे तळताना ते धुवून घेतले असल्यास पूर्णपणे कोरडे करून मगच तळा.
चकली किंवा शेव पाडताना तेलात जे लहान तुकडे किंवा कण पडतात, ते प्रत्येक घाणा तळल्यानंतर एका छोट्या बारीक स्टीलच्या चाळणीने लगेच बाहेर काढून घ्या.