Swarali Pawar
उन्हाळा आणि कमी पावसामुळे उसावर पाण्याचा ताण वाढतो. योग्य उपाय केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता टिकवता येते.
पाने वाळतात, ऊस कोरडा पडतो आणि तडा जातो. मुळांची कार्यक्षमता कमी होऊन वाढ खुंटते.
सरीमध्ये पाचट टाकल्यास बाष्पीभवन कमी होते. जमिनीत ओलावा टिकून राहून पाणी बचत होते.
ठिबक सिंचनाने ५०% पेक्षा जास्त पाणी वाचते. सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी देणे योग्य.
फुले १३००७, को ८६०३२ यांसारख्या जाती ताण सहन करतात. कमी पाण्यातही चांगली वाढ देणाऱ्या वाणांची निवड करा.
गांडूळ खत आणि शेणखतामुळे मातीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे पिकाला पाण्याची उपलब्धता जास्त होते.
तण काढल्यास पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होते. पालाशयुक्त खतामुळे पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
केओलिन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर ठरते. वेळीच उपाय केल्यास उसाची वाढ आणि उत्पादन टिकते.