Anuradha Vipat
महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज ७ ते ९ तासांची शांत आणि पुरेशी झोप मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉज यामुळे मोठ्या प्रमाणावर संप्रेरकांचे बदल होत असतात.
झोप पूर्ण न झाल्यास मेंदूला विश्रांती मिळत नाही. महिलांमध्ये डिप्रेशन , अचानक मूड बदलणे , अँझायटी आणि सतत चिडचिड होणे या समस्या दुप्पट प्रमाणात वाढतात.
कमी झोपल्यामुळे शरीरातील 'लेप्टिन' कमी होते आणि 'घ्रेलीन' वाढते. यामुळे रात्रीच्या वेळी गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा वाढते आणि वजन झपाट्याने वाढू लागते.
सततची अपुरी झोप महिलांमध्ये रक्तदाब वाढवते. तसेच यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, चेहरा निस्तेज दिसणे आणि अकाली सुरकुत्या पडणे अशा समस्या उद्भवतात.
चांगली झोप घेतल्याने शरीर संसर्गाशी लढणाऱ्या पेशी तयार करते, ज्यामुळे महिला वारंवार आजारी पडत नाहीत.