Anuradha Vipat
महिलांच्या आरोग्यासाठी दालचिनी आणि मध एकत्र खाणे हे एका अमृततुल्य औषधासारखे काम करते.
दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, तर मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात.
दालचिनी शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवते, ज्यामुळे ओव्हुलेशन सुधारते. रोज कोमट पाण्यात दालचिनी आणि मध घेतल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान पोटात आणि कंबरेत होणाऱ्या तीव्र वेदना व पेटके कमी करण्यासाठी दालचिनीचा चहा आणि मध अत्यंत प्रभावी ठरतात.
दालचिनी आणि मध शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते.
हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. १ चमचा मधामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास किंवा हे मिश्रण खाल्ल्यास रक्ताभिसरण सुधारते.
वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये सांधेदुखी आणि हाडे कमकुवत होण्याचा त्रास सुरू होतो. दालचिनी आणि मधाचे नियमित सेवन केल्यास सांध्यांची सूज कमी होते.