Buffalo Management : वाढत्या उन्हात कसं असाव म्हशींच व्यवस्थापन?

Team Agrowon

म्हशींचा काळा रंग आणि शरीरावर केसांचा विरळ थर असल्यामुळे म्हशींवर जास्त तापमानाचा ताण येतो.  

Buffalo Management | Agrowon

म्हशीच्या त्वचेमध्ये देशी गाईपेक्षा कमी घाम ग्रंथी असतात, ज्या त्वचेच्या खोलवर असतात, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे म्हशीच्या शरीराच तापमान वाढण्यास मदत होते.

Buffalo Management | Agrowon

म्हशीच्या ग्रंथी सूर्यकिरणांना जास्त प्रभावीपणे परावर्तित करण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेतील तेल स्राव जास्त प्रमाणात होतो. उन्हाळ्यात म्हशी चिखलात लोळतात किंवा पाण्यात डुंबतात.

Buffalo Management | Agrowon

म्हशींची शारीरिक रचना आणि वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे इतर जनावरांपेक्षा म्हशी खूप कमी प्रमाणात शारिरीक तापमानाच नियंत्रण करु शकतात.

Buffalo Management | Agrowon

म्हशींमध्ये नैसर्गीक यंत्रणा असते जी जास्त तापमानातही तग धरून राहण्यास मदत करते. म्हशींच्या काळ्या त्वचेमध्ये असंख्य मेलेनिन रंगद्रव्य असतात, जे सूर्यप्रकाशातील अतिनील किरण घटकांपासून संरक्षण देतात.

Buffalo Management | Agrowon

म्हशीच्या त्वचेच्या बाहेरील अंगात सेबेशियस ग्रंथी चांगल्या प्रकारे विकसित असतात. या ग्रंथींमधून तेलकट स्राव होत असतो. त्यामुळे म्हशींची त्वचा पाणी आणि चिखलासाठी निसरडी बनते.

Buffalo Management | Agrowon

उन्हाळ्यात म्हशीच्या शरीरातील अंतर्गत उष्णता वाढते, म्हशींच खाद्य सेवन कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यात म्हशींच दूध कमी होत. म्हशींच्या प्रजननावर परिणाम होतो. 

Buffalo Management | Agrowon