Groundwater Recharge: एल निनोमुळं यंदा पाऊस कमी; जमिनीत पाणी मुरवण्याची वेळ आली!

Swarali Pawar

यंदा पाऊस कमी पडणार?

एल निनोमुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक थेंब जपणं आणि साठवणं आता खूप महत्त्वाचं आहे.

Growundwater Level | Agrowon

भूजल म्हणजे काय?

पावसाचे पाणी जमिनीत झिरपून खाली साठते, त्याला भूजल म्हणतात. हेच पाणी विहीर आणि बोअरवेलमधून वापरलं जातं.

Growundwater Level | Agrowon

भूजल कमी का होतंय?

पाण्याचा वापर वाढतोय, पण पुनर्भरण कमी होतंय. यामुळे भूजल पातळी सतत खाली जात आहे.

Growundwater Level | Agrowon

भूजल पुनर्भरण म्हणजे काय?

पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची प्रक्रिया म्हणजे पुनर्भरण. यामुळे भविष्यासाठी पाण्याचा साठा तयार होतो.

Growundwater Level | Agrowon

पुनर्भरणाचे फायदे

भूजल वाढल्याने विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी टिकतं. दुष्काळातही पिकांना पाणी उपलब्ध राहते.

Growundwater Level | Agrowon

खर्चात बचत कशी?

पाणी वर आल्याने कमी वीजेत पाणी उपसता येतं. यामुळे सिंचनाचा खर्चही कमी होतो.

Growundwater Level | Agrowon

गुणवत्ता सुधारते

भूजल वाढल्याने पाण्याचा खारटपणा कमी होतो. तसंच मातीची धूपही कमी होते.

Growundwater Level | Agrowon

भविष्यासाठी गुंतवणूक

पावसाचे पाणी साठवणं म्हणजे भविष्यासाठी बचत आहे. हीच “पाण्याची फिक्स्ड डिपॉझिट” दुष्काळात उपयोगी पडते.

Growundwater Level | Agrowon

Biodynamic Composting: बायोडायनॅमिक कंपोस्टिंग: कमी खर्चात तयार करा उत्तम सेंद्रिय खत

अधिक माहितीसाठी...