Rabi Onion Harvest: उन्हाळ्यात रब्बी कांद्याची काढणी: योग्य नियोजनाने मिळवा चांगले उत्पादन

Swarali Pawar

कांदा काढणीची तयारी

सध्या रब्बी कांद्याचे पीक काढणीच्या टप्प्यावर आले आहे. उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यास कांद्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही टिकून राहतात.

Summer Onion Harvesting | Agrowon

उन्हाळ्याचा परिणाम

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त होतो. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि कांदा लवकर सुकण्याचा धोका वाढतो.

Summer Onion Harvesting | Agrowon

पाणी व्यवस्थापन?

जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी गरजेनुसार वेळेवर पाणी देणे आवश्यक आहे. परंतु अति पाणी दिल्यास कांद्याची वाढ आणि गुणवत्ता दोन्हीवर परिणाम होऊ शकतो.

Summer Onion Harvesting | Agrowon

सूक्ष्म अन्नद्रव्ये

कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्यावीत. ही फवारणी पुनर्लागणीनंतर साधारण ६० आणि ७५ दिवसांनी करावी.

Summer Onion Harvesting | Agrowon

कीड व रोग नियंत्रण

फुलकिडे आणि रोग नियंत्रणासाठी कार्बोसल्फान २ मि.ली. आणि ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.

Summer Onion Harvesting | Agrowon

लाल कोळीवर नियंत्रण

कांद्यावर लाल कोळी दिसल्यास गंधक २ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. पर्याय म्हणून डायकोफॉल २ मि.ली. प्रति लिटर फवारणीही प्रभावी ठरते.

Summer Onion Harvesting | Agrowon

काढणीपूर्व काळजी

कांदा काढणीच्या सुमारे २० दिवस आधी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी बंद करावी. तसेच डेंगळे आलेले कांदे दिसल्यास ते लगेच शेतातून काढून टाकावेत.

Summer Onion Harvesting | Agrowon

पाणी कधी बंद करावे?

पाने पिवळी पडून माना पडू लागल्यावर काढणीच्या १५–२० दिवस आधी पाणी बंद करावे. यामुळे कांदे घट्ट होतात आणि काढणीवेळी नुकसान कमी होते.

Summer Onion Harvesting | Agrowon

Rabi Crop Harvesting: रब्बी पिकांची काढणी करताय? नुकसान टाळण्यासाठी लक्षात ठेवा हे सोपे नियम

अधिक माहितीसाठी...