Salt Daily Diet : आहारात मिठाचे प्रमाण किती असावं, WHO चा असा आहे अंदाज

sandeep Shirguppe

मीठ किती खावे

दिवसात मीठ किती खावे असा प्रश्न पडतो. बाजारात उपलब्ध पिझ्झा-बर्गरमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त आढळते.

Salt Daily Diet | agrowon

आरोग्यास हानिकारक

जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनचा धोकाही असू शकतो.

Salt Daily Diet | agrowon

५ ग्रॅमपेक्षा मीठ कमी खावे

WHO नुसार, दररोज फक्त ५ ग्रॅम पेक्षा कमी मीठ खावे. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.

Salt Daily Diet | agrowon

७५ टक्के मीठ प्रोसेस्ड फूड

अनेक उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, आहारातील सुमारे ७५ टक्के मीठ प्रोसेस्ड फूड आणि बाहेर तयार केलेल्या अन्नातून येते.

Salt Daily Diet | agrowon

हृदयासाठी हानिकारक

दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका असू शकतो.

Salt Daily Diet | agrowon

पचनाशी संबंधित समस्या

पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतात.

Salt Daily Diet | agrowon

किडनीच्या समस्या

मीठामुळे तुमच्या किडनीलाही समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते.

Salt Daily Diet | agrowon