Mahesh Gaikwad
मीठाशिवाय जेवण अपूर्ण वाटते, पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच WHO नुसार दररोज एक प्रौढ व्यक्तीसाठी ५ ग्रॅम (एक चमचा) मीठ खाणे योग्य आहे.
अति प्रमाणात मीठ खाण्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे विकार आणि स्ट्रोक या सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
५ ग्रॅम मीठामध्ये जवळपास २ ग्रॅम सोडियम असते. सोडियम जास्त म्हणजे उच्च रक्तदाबाचा धोका अधिक उद्भविण्याची शक्यता.
फरसाण, बिस्किट्स, ब्रेड, चीज, फ्राईस, सॉस, लोणचे, फास्टफूड यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
जेवण बनविताना चवीनुसारच मीठ घालावे. यासाठी जेवण करताना जेवणात मीठ घातल्यानंतर जेवणाची चव चाखून पाहावी.
लहान मुलांच्या जेवणात दिवसभरात केवळ २-३ ग्रॅम इतकेच मीठ घालावे. अति मीठ खाण्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो.
पांढरे मीठ खाण्याऐवजी सैंधव मीठ किंवा लो-सोडियम मीठ जेवणात वापरावे. पण हे मीठ सुध्दा कमी प्रमाणातच खावे.
कच्चे मीठ आरोग्यासाठी सर्वात घातक असते. त्यामुळे जेवणात वरून मीठ घालणे किंवा खाणे टाळावे. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.