sandeep Shirguppe
दिवसभर तजेलदार आणि निरोगी राहण्यासाठी सकस आहार, पाणी, त्याचप्रमाणे पुरेशी झोपही महत्त्वाची असते.
कमी झोपेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा आणि नैराश्य यासारखे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात.
अशा परिस्थितीत दररोज किती झोपेची गरज असते हे त्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते.
नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अहवालानुसार, निरोगी राहण्यासाठी रात्री किमान ७ तासांची झोप आवश्यक आहे.
४ ते १२ महिन्यांची मुले १२ ते १६ तास, १ ते २ वर्षे वयोगटातील मुले ११ ते १४ तास, ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुले ११ ते १४ तास.
६ ते १२ वर्षे वयोगटातील मुले ९ ते १२ तास, १३ ते १८ - ८ ते १० तास 18 वर्षांनंतर किमान ७ तास, ६० वर्षांनंतर - ८ तास झोपावे.
डॉक्टरांच्या मते, पुरेशी झोप न घेतल्याने महिलांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
कमी झोपेचा परिणाम शरीरातील पेशींवरही होतो. खनिजांचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे हाडे देखील कमकुवत होऊ शकतात.