Chewing Gum : एक च्युइंगम किती वेळ चघळावा, तज्ज्ञ काय म्हणतात

sandeep Shirguppe

च्युइंगम

मुख दुर्गंधी टाळण्यासाठी अनेकजण च्युइंगम खातात, च्युइंगम आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, असेही तज्ज्ञ सांगतात.

Chewing Gum | agrowon

लाळेचा प्रवाह वाढतो

याशिवाय तोंडातील खराब बॅक्टेरियाचे प्रमाण ७५% कमी होते. तसेच जेवणानंतर च्युइंगम चघळल्याने लाळेचा प्रवाह वाढतो.

Chewing Gum | agrowon

किती वेळ च्युइंगम चघळावे

परंतु जास्त वेळ च्युइंगम चघळता तेव्हा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. च्युइंगम किती वेळ चघळावे हे जाणून घेतलं पाहिजे.

Chewing Gum | agrowon

शुगर फ्री च्युइंगम

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, जर च्युइंगम खाल्ल्याने दातांची किड कमी होऊ शकते तर शुगर फ्री च्युइंगमचे सेवन करावे.

Chewing Gum | agrowon

च्युइंगम १५ मिनिटं चघळावे

एक च्युइंगम १५ मिनिटं चघळावे. नंतर तो तोंडातून काढून टाकावा. च्युइंगममुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

Chewing Gum | agrowon

चेहऱ्याचे स्नायू मजबूत

तुमच्या चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात, पण जास्त वेळ च्युइंगम चघळल्याने तुमच्या दातांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Chewing Gum | agrowon

तज्ज्ञांचे मत काय आहे?

काही तज्ज्ञांच्या मते जर एखादी व्यक्ती जास्त वेळ च्युइंगम चघळत असेल तर त्यामुळे दातांचा वरचा थर, ज्याला इनॅमल म्हणतात तो कमी होऊ शकतो.

Chewing Gum | agrowon

कोणते नुकसान होऊ शकतात?

एकच च्युइंगम तासभर चघळल्याने टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट्सचा त्रास असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात.

Chewing Gum | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Chewing Gum | agrowon