Mahesh Gaikwad
मासिक पाळीमध्ये अनेक स्त्रियांना थकवा, डोकेदुखी, चिडचिडेपणा या सारख्या आरोग्याच्या समस्या होतात.
अशावेळी मासिक पाळीमध्ये महिलांनी कीवी खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
कीवीमध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे पाळीदरम्यान होणारा अशक्तपणा कमी होतो.
कीवीमध्ये अँटि-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन-सी असते, ज्यामुळे पाळीतील पोटदुखी आणि स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते.
कीवीमध्ये नैसर्गिक साखर आणि तंतुमय पदार्थ असतात. याच्या सेवनामुळे थकवा, कमजोरी कमी होऊन उर्जा मिळते.
कीवीतील व्हिटामिन-सी तणाव कमी करण्यास मदत करते आणि पाळीदरम्यान होणारे मूड स्विंग नियंत्रणात ठेवते.
मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी व्हिटामिन-ई उपयुक्त असते.
कीवीतील ओमेगा-३ फॅटी अॅसिड सूज कमी करते आणि वेदनांपासून आराम देते.