Pomogranate Processing : डाळिंबापासून अनारदाना कसा बनतो?

Team Agrowon

डाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थाला उत्तर भारतात चांगली मागणी आहे. हा पदार्थ आंबट जातीच्या म्हणजेच ५ ते ७ टक्के आम्लता असलेल्या डाळिंबापासून बनवतात.

Pomogranate Processing | Agrowon

अनारदाना चा उपयोग अन्नपदार्थात आंबटपणा आणण्यासाठी करतात. टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे अनारदानाही बरेच दिवस टिकवून ठेवता येतो.

Pomogranate Processing | Agrowon

अनारदाना प्रामुख्याने आंबट जातीच्या डाळिंबापासून करतात. पिकलेल्या डाळिंबाचे दाणे उन्हात वाळून त्यापासून अनारदाना कसा बनवितात

Pomogranate Processing | Agrowon

रशियन जातीच्या आंबट डाळिंबापासून अनारदाना बनवितात. परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डाळिंबाच्या कमी आंबट जाती गणेश, मृदुला पासूनसुद्धा चांगल्या प्रकारे आनारदाना करता येऊ शकतो.

Pomogranate Processing | Agrowon

प्रथम डाळिंब फळे निवडून ती स्वच्छ धुवून, साल काढून, दाणे वेगळे करावेत. नंतर १ किलो डाळिंबाच्या दाण्यात ५० ग्रॅम सायट्रीक आम्ल मिसळून ते सुर्यप्रकाशात ३ ते ४ दिवस सुकवावेत.

Pomogranate Processing | Agrowon

किंवा कॅबिनेट ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १४ ते १६ तास सुकवावेत.

Pomogranate Processing | Agrowon

तयार झालेला अनारदाना प्लॅस्टिक पिशव्यात भरुन त्याची साठवण किंवा विक्री करावी.

Pomogranate Processing | Agrowon
Dragonfruit | Agrowon