California Almond Farming ः बदामाचे आगार असलेल्या कॅलिफोर्नियात कशी होते बदामाची शेती?

Team Agrowon

बदाम उत्पादनात जगात अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे राज्य सर्वांत मोठे बदाम उत्पादक राज्य आहे.

California Almond Farming | Agrowon

जगाच्या तुलनेत ८० टक्के उत्पादन कॅलिफोर्निया राज्यात होते. अठराव्या शतकात स्पॅनिश मिशनऱ्यांनी कॅलिफोर्नियामध्ये बदाम आणला.

California Almond Farming | Agrowon

अनुकूल वातावरण आणि जमिनीमुळे येथील शेतकऱ्यांनी बदाम लागवडीस सुरुवात केली. बदामाचे झाड २५ ते ३० वर्षांपर्यंत उत्पादन देते. या पिकास कमी पाणी लागते.

California Almond Farming | Agrowon

बदामाच्या अल्ट्रा, बट्टे, कॅलिफोर्निया, पेपर शेल, पियरलेस, कार्मेल, मखदूम, वारीस या जाती चांगले उत्पादन देतात. साधारण तीन ते पाच वर्षांत फळे यायला सुरुवात होते.

California Almond Farming | Agrowon

परागीभवनासाठी मधमाश्‍या फार महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यामुळे बदामाच्या फळबागेत मधमाशीपालन व्यवसायाला चालना मिळाली आहे.

California Almond Farming | Agrowon

बदामाच्या कवचाचा उपयोग पशुखाद्यामध्ये केला जातो. कॅलिफोर्नियामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरपासून परिपक्व फळे झाडावरून काढली जातात.

California Almond Farming | Agrowon

मोठ्या यंत्राद्वारे बदामाची झाडे हलवली जातात. जमिनीवर पडलेली फळे तिथेच आठ, दहा दिवस वाळवली जातात किंवा यंत्राद्वारे गोळा करून ती सावलीमध्ये वाळवून प्रक्रिया केली जाते.

California Almond Farming | Agrowon

कॅलिफोर्निया परिसरात बदाम प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांनी या बदामाचे जागतिक पातळीवर चांगले ब्रॅण्डिंग केले आहे.

California Almond Farming | Agrowon