Lawn Farming : लॉन ची शेती कशी केली जाते?

Team Agrowon

जमिनीची निवड

हिरवळीसाठी सुपीक, सपाट आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमीन तशी नसेल तर तयार करून घ्यावी. भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळणे आवश्यक आहे.

Lawn Farming | Agrowon

जातींची निवड

सिलेक्शन-१, डायमंड आणि मेक्सिकन या जातींची निवड करावी.

Lawn Farming | Agrowon

लागवडीची वेळ

लागवडीसाठी जमीन तयार करण्याचे काम शक्यतोवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावे लागते. प्रत्यक्ष लागवड जोराचा पाऊस संपल्यानंतर परंतु कडक थंडी पडण्यापूर्वी पूर्ण करावी.

Lawn Farming | Agrowon

लागवडीचे क्षेत्र

लागवडीचे क्षेत्र प्रथम मोजून निवडलेली जमीन ५० सेंमी खोल खोदून त्यातील माती बाहेर काढावी. त्यानंतर तळातील २० ते २५ सेंमी भाग दगड, विटांच्या तुकड्यांनी भरून घ्यावा.

Lawn Farming | Agrowon

मातीची निवड

खोदून काढलेल्या मातीत पोयट्याची माती मिसळून पुन्हा २० ते २५ सेंमीचा दुसरा थर द्यावा. थरासाठी एकदम काळी चिकण किंवा चुनखडीयुक्त माती वापरु नये.

Lawn Farming | Agrowon

तणाचा नायनाट

प्रत्येक थर तयार करतेवेळी पाणी शिंपडल्याने मातीचे थर चांगले बसतात. पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर हिरवळीसाठी तयार केलेल्या जागेवरील उगवलेले तण मुळासकट उपटून टाकावे. हिरवळीच्या बाजूला वाट ठेवावी.

Lawn Farming | Agrowon

हिरवळीचे प्रमाण

हिरवळ लागवड काशा, बिया, टर्फिग आणि टर्फ प्लास्टरींग पासून करण्यात येते. साधारणपणे १०० चौरस फूट क्षेत्रासाठी १० किलो हिरवळ लागते.

Lawn Farming | Agrowon
Lawn Farming | Agrowon