Aslam Abdul Shanedivan
द्राक्ष कोणाला आवडत नाही. कोण द्राक्षे खातात कर कोण बेदाणे. तर कोणाली त्याची वाईन आवडते. पण शेतकऱ्यांना द्राक्षे लागवड करताना योग्य वाणाची निवड करावी लागते.
पण द्राक्ष मण्यांची फुगवण, योग्य ब्रीक्स, गोड रसाळ चव आणि टिकाऊक्षमता आदी गुणवत्तेच्या अभावाने आपल्या देशातील द्राक्षे मागे पडत आहेत.
तर पेरू, नेदरलॅंड, चिली, इटली, अमेरिका हे देश त्यांच्या उत्तम द्राक्ष वाणांमुळे आपला दबदबा टिकवून आहेत.
मात्र आता मोहाडीच्या ‘सह्याद्री फार्म’मुळे यात बदल होत असून आपल्याकडेही योग्य द्राक्ष उत्पादनासाठी प्रयत्न केले जात आहे.
‘सह्याद्री फार्म’ने कॅलिफोर्नियातील आरा द्राक्ष वाणाची निर्मिती येथे केली आहे. यामुळे आता येथे कमी उत्पादन खर्चात निर्यातीसाठी सर्वोत्तम असलेला आरा द्राक्ष उत्पादकांना फायदेशीरच ठरणार आहे.
‘सह्याद्री फार्म’च्या माध्यमातून हिरव्या द्राक्षांमध्ये आरा १५, ३०, ८ ए-१९+४, लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये आरा १३, १९, २८, २९ आणि काळा रंगाच्या द्राक्षांत आरा २७, ३२, ए-१४ हे वाण राज्यातील द्राक्ष उत्पादकांना उपलब्ध होणार आहेत.
सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने ‘आरा’ या द्राक्ष वाणाच्या माध्यमातून द्राक्ष नवे वाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. तर विक्रीच्या पर्यायी व्यवस्था ही उपलब्ध करून दिल्या आहेत.