Anuradha Vipat
इंटरमिटंट फास्टिंग महिलांसाठी सुरक्षित आहे, परंतु पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरावर याचा वेगळा परिणाम होतो
महिलांचे शरीर संप्रेरकांच्या बदलांना अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे महिलांनी इंटरमिटंट फास्टिंग करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे
महिलांसाठी १४ तास उपवास आणि १० तास खाणे ही पद्धत सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मानली जाते.
पहिल्याच दिवशी १४ तास उपवास करण्याऐवजी १२ तासांपासून सुरुवात करा. शरीराला सवय झाल्यावर वेळ वाढवा.
मासिक पाळीच्या अगदी आधीच्या आठवड्यात आणि पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत कडक उपवास करणे टाळा.
उपवास सोडल्यानंतरच्या १० तासांत जंक फूड खाण्याऐवजी प्रोटीन, निरोगी फॅट्स, कॅल्शियम आणि फायबरयुक्त सकस आहार घ्या.
उपवासाच्या काळात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, जिरे पाणी किंवा ग्रीन टी प्या.