Swarali Pawar
एवढं ऊन असून तू चहा पिते का/ पितो का? असा प्रश्न सहसा विचारला जातो.. पण उन्हाळ्यात खरंच चहा प्यावा का? याचीच माहिती आज घेऊया..
चहामध्ये कॅफिन असतं, जे शरीराला थोडं उत्तेजित करतं. पण जास्त घेतल्यास शरीर गरम होण्याची शक्यता असते.
गरम चहा प्यायल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. यामुळे घाम जास्त येतो आणि शरीर थकलेलं वाटू शकतं.
चहा जास्त पिल्यास शरीरातील पाणी कमी होऊ शकतं. उन्हाळ्यात आधीच पाण्याची गरज जास्त असते, त्यामुळे काळजी घ्या.
नाही, पूर्ण बंद करण्याची गरज नाही. फक्त प्रमाणात आणि योग्य वेळी चहा घेणं महत्त्वाचं आहे.
'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा पाहिजेच' असं आपण म्हणतो तसंच सकाळी किंवा संध्याकाळी हलका चहा घेणं उत्तम. दुपारच्या कडक उन्हात चहा टाळलेला बरा.
लिंबूपाणी, ताक, नारळपाणी हे उत्तम पर्याय आहेत. हे शरीर थंड ठेवतात आणि ऊर्जा देतात.
दिवसातून 1 ते 2 कप चहा पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त घेतल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.