AI in Sugarcane: एआय आधारित उस शेतीचे फायदे काय? उत्पादनात वाढ शक्य?

Swarali Pawar

ऊस शेतीत नवी क्रांती!

आता ऊस शेतीत एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणे सोपे होत आहे.

New Era of Sugarcane Farming | Agrowon

उत्पादनात वाढ

एआय उपग्रह आणि सेन्सरमधील माहिती वापरतो. त्यामुळे ऊस उत्पादन २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

Yield Growth | Agrowon

मातीची काळजी

सेन्सरमुळे मातीतील अन्नद्रव्ये आणि ओलावा कळतो. त्यामुळे खतांचे योग्य नियोजन करता येते.

Soil Care | Agrowon

पाण्याची बचत

मातीला किती पाणी हवे हे सेन्सर सांगतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

Water Capacity | Agrowon

कीड-रोगांवर आधीच नियंत्रण

हवामान आणि डेटा विश्लेषणामुळे धोका आधी कळतो. म्हणून वेळेवर उपाय करून नुकसान कमी करता येते.

Disease Pest Prevention | Agrowon

सेंद्रिय कर्ब

मातीतील सेंद्रिय कर्बाचे मोजमाप करता येते. भविष्यात कार्बन क्रेडिटमधून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

Soil Carbon | Agrowon

शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा

उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. त्यामुळे नफा अधिक मिळण्याची संधी वाढते.

Economic Benefit | Agrowon

स्मार्ट शेतीकडे वाटचाल

एआयमुळे ऊस शेती अधिक अचूक आणि आधुनिक होत आहे. तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेतकरी भविष्यासाठी सज्ज राहू शकतात.

Smart Farming Age | Agrowon

Hair Care: दाट आणि निरोगी केसांसाठी सीताफळाच्या बिया रामबाण उपाय; सोपा घरगुती उपाय!

Agrowon
अधिक माहितीसाठी...