Anuradha Vipat
भाज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आणि आवश्यक आहेत, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
भाज्यांचे अतिसेवन केल्याने शरीराला गरजेपेक्षा जास्त फायबर आणि काही विशिष्ट खनिजे मिळतात.
जर तुम्ही अचानक किंवा प्रमाणाबाहेर भाज्या खाल्ल्या, तर पचनसंस्थेला ते पचवणे कठीण जाते. यामुळे पोटात गॅस होणे, पोट फुगणे , पोटदुखी आणि कधीकधी तीव्र अतिसार किंवा बद्धकोष्टतेचा त्रास होऊ शकतो.
पालक, बीट आणि रताळे यांसारख्या काही भाज्यांमध्ये 'ऑक्झलेट'चे प्रमाण जास्त असते. या भाज्यांचे अतिसेवन केल्यास किडनी स्टोन होऊ शकते.
अतिप्रमाणामध्ये फायबर शरीरात गेल्यास ते जस्त, लोह , कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या आवश्यक खनिजांना स्वतःकडे बांधून ठेवते.
कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि नवलकोल यांसारख्या भाज्यांमध्ये 'गॉइट्रोजेन्स' नावाचे घटक असतात.
ज्या लोकांना किडनीचे विकार आहेत, त्यांनी भाज्या जास्त खाल्ल्यास रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढू शकते, जी हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.