Muskmelon Harvesting : खरबूज काढणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Team Agrowon

खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी फळाच्या गराचा उपयोग केला जातो.

Muskmelon Harvesting | Agrowon

खरबुजापासून दर्जेदार पदार्थनिर्मितीसाठी योग्यवेळी काढणी, साठवण आणि प्रक्रियेसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

Muskmelon Harvesting | Agrowon

फळे काढणीस आल्यानंतर पहिल्या दोन ते तीन तोडण्या एक दिवसाच्या अंतराने केल्या जातात. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवसांपर्यंत दरराेज तोडणी केली जाते.

Muskmelon Harvesting | Agrowon

दोन तोडण्यांमधील अंतर हे वेलीची सुदृढता, फळांची संख्या, हंगाम व बाजारभाव यांचा अंदाज घेऊन ठरविले जाते.

Muskmelon Harvesting | Agrowon

तयार रोपांची लागवड आणि प्लॅस्टिक आच्छादन केलेल्या पिकातील फळे ही बियांपासून लागवड केलेल्या पिकापेक्षा ७ ते १४ दिवस लवकर काढणीसाठी येतात.

Muskmelon Harvesting | Agrowon

पूर्ण पक्व झालेली फळे वेलीपासून अलग होतात. त्यांच्यात साखरेची अत्युच्च पातळी असते.

Muskmelon Harvesting | Agrowon

पक्वतेनंतर लवकरात लवकर फळे न खाल्‍ल्यास किंवा शीतगृहात न ठेवल्यास त्यांच्यातील साखर व फळांच्या दर्जात वेगाने घट होण्यास सुरवात होते.

Muskmelon Harvesting | Agrowon