Swarali Pawar
लहान अळ्या पात्यांना व कळ्यांना तर मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र करून आतील भाग खातात. त्यामुळे पिकावर सड व नुकसान वाढते.
ही अळी शेंड्यांना छिद्र करून खाते आणि नंतर पात्या, कळ्या व फुलांवर हल्ला करते. त्यामुळे गळ वाढते व उत्पादन घटते.
अळी बोंडात शिरून सरकी खाऊन नुकसान करते. त्यामुळे रुईची प्रत कमी होते, तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.
२० बोंडांपैकी २ बोंड छिद्रित दिसणे किंवा सरासरी ५–८ पतंग सापळ्यात अडकणे म्हणजे पिकाने नुकसान पातळी गाठलेली असते.
फ्ल्युबेनडायअमाइड, इन्डोक्साकार्ब किंवा स्पिनोसॅड कीटकनाशके पाण्यात मिसळून फवारावीत. वेळेवर उपाय केल्यास नुकसान टाळता येते.
परजीवी कीटक ट्रायकोग्रामॅटोइडिया बॅक्ट्री सोडावेत. तसेच प्रोफेनोफॉस, इमामेक्टिन बेन्झोएट किंवा इन्डोक्साकार्ब वापरून फवारणी करावी.
एकाच कीटकनाशकाची फवारणी वारंवार करू नये. शिफारस केलेले प्रमाण व वेळ पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
योग्य वेळी किड ओळख, शास्त्रीय फवारणी आणि परजीवी कीटकांचा वापर केल्यास कपाशीचे संरक्षण शक्य आहे. यामुळे रुई व सरकीचे उत्पादन व गुणवत्ता टिकते.