Green Manuering : जमिनीचा पोत टिकविणारी हिरवळीची पिके कशी निवडाल?

Team Agrowon

जमिनीचा पोत टिकविण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

Green Manuering | Agrowon

हिरवळीचे पीक फुलोऱ्यामध्ये येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास त्यापासून मुख्य अन्नद्रव्ये व सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो.

Green Manuering | Agrowon

हिरवळीचे खत जमिनीत अन्नद्रव्य पुरवठ्याबरोबर भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करते.

Green Manuering | Agrowon

हिरवळीच्या खतासाठी धैंचा, नाग, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरिपुष्प, चवळी, मूग या पिकांची लागवड करावी.

Green Manuering | Agrowon

हिरवळीचे पीक भिन्न हवामान आणि जमिनीत चांगले वाढणारे असावे. पीक लवकर वाढणारे, एक ते दीड महिन्यात येणारे असावे.

Green Manuering | Agrowon

प्रतिकूल परिस्थितीत उदा. दुष्काळात कमी किंवा जास्त तापमानात तग धरणारे हवे.

Green Manuring | Agrowon

मुळांवर गाठी तयार करण्याची किंवा नत्र स्थिर करण्याची क्षमता असावी. पाला भरपूर, हिरवागार असावा. जमिनीत खोलवर जाणारी मुळे व खोड कोवळे, लुसलुशीत असावे. जमिनीत गाडल्यास झपाट्याने कुजावे.

Green Manuering | Agrowon