Pista : मानवी आहारात पिस्ता आला कसा ?

Team Agrowon

पिस्त्याची मूळ जन्मभूमी ही इराण, सीरिया, लेबनॉन, रशिया आणि अफगाणिस्तान. पुरातत्त्व शास्त्रज्ञांना ईशान्य इराक जवळ जेरोम येथे खोदकामाच्या ठिकाणी पिस्त्याचे पुरावे सापडल्याचा उल्लेख आहे.

Pista | Agrowon

पर्शियन लोकांनी पिस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला. अनेक मिष्टान्न बनवताना, काही सॉस घट्ट करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. तसा तो त्या काळात शाही खाद्यपदार्थ होता.

Pista | Agrowon

युरोपात मोठ्या प्रमाणामध्ये आयात केला जात होता व खूप महाग देखील होता. पण ज्यांना परवडत होते त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा व्यापार होत असे.

Pista | Agrowon

१८८० च्या दशकात आयात पिस्ता अमेरिकेत खूप लोकप्रिय होता. तत्पूर्वी १८५४ ते १८७५ पर्यंत येथील हवामानात येऊ शकणाऱ्या पिस्ता झाडांच्या लागवडीवर संशोधन केले.

Pista | Agrowon

पुढे देशातील पिस्ता लोकप्रिय होऊन त्यांनी निर्यातीत मोठे स्थान पटकावून आज अनेक देशांत तो निर्यात होत आहे.

Pista | Agrowon

हळूहळू १९६० च्या दशकात कॅलिफोर्निया, ऍरिझोना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड झाली.

Pista | Agrowon

वाऱ्याने परागीभवन होत असल्यामुळे प्रति तीस मादी झाडा पाठीमागे एका नर झाडाची लागवड केली जाते.

Pista | Agrowon

पिस्ता हे विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटचा खजिना आहे. त्यामुळे अनेक रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील त्याचा वापर होतो.

Pista | Agrowon