Anuradha Vipat
घरातील काही वस्तू स्वच्छ दिसत असल्या तरी त्या जंतूंचे मुख्य माहेरघर असू शकतात.
भांड्यांचा स्पंज सतत ओला असतो, ज्यामुळे त्यात लाखो बॅक्टेरिया वाढतात.
आपण ब्रश स्वच्छ करतो पण तो ज्या स्टँडमध्ये ठेवतो तिथे ओलावा आणि अंधारामुळे बुरशी धरू शकते.
टीव्हीचा रिमोट आपण दिवसातून अनेकदा हाताळतो, पण ते कधीच स्वच्छ करत नाही. यावर टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जंतू असू शकतात
झोपताना शरीरातील मृत त्वचा आणि घाम उशीवर साठतो. यामुळे धुळीतील कीटक वाढतात.
घरातील प्रत्येक व्यक्ती दाराच्या मुठीला हात लावते. यामुळे एकाचे जंतू दुसऱ्याला सहज मिळतात.
किचनमध्ये उष्टे भांडे किंवा अन्न उघडे ठेवल्याने आजार पसरतात आणि वास्तू दोष निर्माण होतो