Anuradha Vipat
आयुर्वेदानुसार उत्तम आरोग्यासाठी थंड किंवा गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार हिवाळ्यात खूप गरम पाणी आणि उन्हाळ्यात खूप थंड पाणी वापरणे टाळावे.
आंघोळीसाठी गरम, कोमट किंवा गार पाणी वापरावे हे व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते.
आयुर्वेदानुसार आंघोळीसाठी कोमट पाणी अधिक फायदेशीर ठरते कारण ते त्वचा कोरडी होऊ देत नाही.
खूप गरम पाण्याने त्वचा कोरडी होऊ शकते. त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते
गार पाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते .पण ते त्वचेसाठी त्रासदायक ठरते.
कोमट पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून राहते आणि रक्ताभिसरण वाढवते