Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीर उबदार ठेवणे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे.
पौष्टिक भाज्या, आले, लसूण आणि मसाल्यांपासून बनवलेले गरमागरम सूप हिवाळ्यात ऊर्जा व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतात.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी आणि लायकोपीन मुबलक असते, तर आले व काळी मिरी घशाची खवखव व सर्दी कमी करतात.
पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन-ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. लसूण नैसर्गिक अँटी-बायोटिक म्हणून काम करते आणि शरीरात उष्णता टिकवते.
शेवग्याच्या शेंगांमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम आणि झिंक असते, जे हाडे मजबूत करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढवते.
पचायला अत्यंत हलके आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले हे सूप आजारपणातून उठल्यानंतर किंवा थंडीत ऊर्जा टिकवण्यासाठी उत्तम आहे. हळदीतील 'कर्क्युमिन' संसर्गाशी लढण्यास मदत करते.
गाजर, ब्रोकोली, मटार, फ्लॉवर आणि सिमला मिरची यांसारख्या हिवाळी भाज्यांमधून शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे व फायबर मिळतात. तुळस श्वसनमार्गाचे आरोग्य सुधारते.