Anuradha Vipat
नोकरी आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. सरकारी कामे वेळेत मार्गी लागतील.
तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
अनेक दिवसांपासून रेंगाळलेले प्रश्न आज मार्गी लागतील. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
जोडीदाराचा सल्ला आज तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आर्थिक व्यवहारात बचतीला प्राधान्य द्या.
कर्मचारी वर्ग आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मनात येणारा आळस किंवा नकारात्मक विचार बाजूला सारून कामावर लक्ष केंद्रित करा.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील आणि महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी होतील.
प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीचे नवीन व फायदेशीर प्रस्ताव समोर येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
हाती घेतलेल्या कामांमध्ये नातेवाईक आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभून सुयश मिळेल.
कौटुंबिक जीवनात उत्तम सुसंवाद राहील आणि काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल आणि प्रगतीची नवी दिशा सापडेल. व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी.
व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी नवीन आणि सकारात्मक दिशा मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
हितशत्रू किंवा विरोधकांवर तुम्ही सहज मात कराल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे दिवस अत्यंत आनंदी जाईल.