Anuradha Vipat
आत्मविश्वास उत्तम राहील. रखडलेली कामे नशिबाच्या साथीने मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल.
तुमच्या मेहनतीमुळे बॉसचा विश्वास जिंकाल. खर्च जरा जपून आणि नियोजनबद्ध करावा.
कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. एखादा व्यावसायिक किंवा आर्थिक प्रवास घडेल, जो फायदेशीर ठरेल.
अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अचानक वाढलेल्या खर्चामुळे तुमचे बजेट थोडे बिघडू शकते.
कामाच्या ठिकाणी कोणाकडूनही जास्त सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. वादविवाद पूर्णपणे टाळावेत.
आर्थिक स्थिती अतिशय मजबूत राहील. उत्साह आणि उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल.
नोकरीत यश व प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.
तुमची चमकदार कामगिरी इतरांना प्रभावित करेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कामानिमित्त प्रवास घडू शकतात. मालमत्ता किंवा प्रॉपर्टीचे उत्तम सौख्य लाभेल.
कामातील जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये परिस्थिती अत्यंत समाधानकारक आणि अनुकूल राहील
दैनंदिन कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी आता हळूहळू कमी होतील.
जुनी अडकलेली येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढल्याने आर्थिक बाजू बळकट होईल.