Anuradha Vipat
दैनंदिन कामांचे योग्य नियोजन करून यश संपादन कराल. मानसिक ताण हलका होईल.
पैशांचा अपव्यय आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना पुनर्विचार करा.
नोकरी-व्यवसायात यश मिळेल आणि मुलांचे प्रश्न मार्गी लागतील.
मालमत्तेची प्रलंबित कामे पूर्ण होतील. मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
नोकरी आणि व्यवसायातील स्थिती अत्यंत समाधानकारक राहील.
व्यवसायात नवीन तंत्रज्ञान अंमलात आणाल आणि जुनी येणी वसूल होतील.
आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचारांमुळे रखडलेली कामे वेगाने पुढे सरकतील.
दैनंदिन कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता असल्याने मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक सांभाळा.
महत्त्वाचे पत्रव्यवहार आणि कामांमध्ये अनेकांचे उत्तम सहकार्य लाभेल.
कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील.
एखादी आनंदाची वार्ता समजेल आणि आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
इतरांवर विसंबून न राहता नियोजित पद्धतीने काम केल्यास यश निश्चित मिळेल.