Anuradha Vipat
दैनंदिन कामे वेळेत मार्गी लागतील . नवीन आर्थिक नियोजनात यश येईल.
ऑफिसमधील अडकलेली कामे मार्गी लागतील.नात्यात संशय घेण्याऐवजी मोकळेपणाने संवाद साधा.
अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करावे.
कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा आणि पदोन्नतीचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्तुती लाभेल. धार्मिक कार्यात किंवा कौटुंबिक शुभ कार्यात सहभाग घ्याल.
खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते. अपचन किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात.
भागीदारीच्या व्यवसायात मोठे निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी कोणताही धोका पत्करू नका.
सहकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात अहंकार आणू नका.
नोकरीत पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. मानसिक मनोबल उत्तम राहील.
नवीन घर, प्लॉट किंवा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे सौख्य लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
जिद्दीने आणि चिकाटीने तुमचे उद्दिष्ट साध्य कराल. प्रॉपर्टीशी संबंधित जुने वाद सुटतील.
अचानक रखडलेले पैसे किंवा जुनी येणी वसूल होतील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील.