Anuradha Vipat
जुने रखडलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक दिलासा लाभेल. अनावश्यक खर्च टाळा.
अडकलेली येणी वसूल करणे सोपे जाईल. आरोग्य स्थिर राहील.
आर्थिक स्थिती मजबूत राहील. कार्यक्षेत्रात वाढ होईल.
जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. कामाचा बोजा जास्त राहील.
कौटुंबिक व्यवसायातील गुंतवणुकीतून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक मिळण्याची शक्यता आहे.
भागीदारीच्या व्यवसायात आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. करिअरसंबंधी महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या हिमतीवर घ्या.
नवीन हितशत्रूंवर मात कराल, परंतु पैशांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कर्मचारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभेल.
आर्थिक अडचण टाळण्यासाठी आज अनावश्यक खर्च कमी करा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये कामाचा ताण व्यावसायिक संवादावर पडू देऊ नका.
उत्पन्न वाढवण्याचे नवीन स्रोत मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.
आर्थिक लाभ होतील आणि जुनी अडकलेली येणी वसूल होतील. घाईगडबडीत खर्च करणे टाळा.
औषधोपचाराचा खर्च कमी होईल. स्वतःच्या मतांविषयी आग्रही राहाल.