Anuradha Vipat
आज तुमच्या सर्जनशील आणि कार्यक्षम गुणांना वाव मिळेल. रखडलेली सरकारी कामे किंवा महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.
कौटुंबिक सुखात वृद्धी होईल. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
आज तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसेल. सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.
पैशांची आवक वाढल्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. वाणीत गोडवा ठेवा.
चंद्र आज तुमच्याच राशीत असल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी व्यवसायातून लाभाचे योग आहेत.
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. अपूर्ण राहिलेली कामे मित्रांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण होतील.
करिअर आणि नोकरीच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. घरगुती वादापासून दूर राहा.
नशिबाची पूर्ण साथ लाभेल. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील.
कोर्टाच्या कामात निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल.
आज अचानक धनलाभाचे योग आहेत, परंतु आरोग्याच्या बाबतीत दिवस थोडा चढ-उतारांचा राहील.
वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारीसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे.