Anuradha Vipat
दिवाळीच्या नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
या दिवशी शरीराला उटणे आणि तेल लावून स्नान केल्याने त्वचा तजेलदार होते आणि शरीरातील थकवा दूर होतो.
बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उटण्यापेक्षा तुम्ही घरीच १००% नॅचरल आणि सुवासिक उटणे सहज तयार करू शकता.
चण्याचे पीठ (बेसन) किंवा मसुराच्या डाळीचे पीठ,तांदळाचे पीठ,चंदन पावडर,आंबेहळद किंवा साधी हळद,गुलाब पाकळ्यांची पावडर ,संतऱ्याच्या सालीची पावडर ,कापूर किंवा वाळा पावडर.
वर दिलेले सर्व सुके साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये एकत्र करून घ्या. चमच्याने सर्व मिश्रणे एकजीव करा.
हे तयार झालेले सुके उटणे एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. हे उटणे महिनाभर सहज टिकते.
अभ्यंगस्नान केल्याने अलक्ष्मी (दारिद्र्य आणि नकारात्मकता) दूर होते आणि जीवनात समृद्धी येते.