Anuradha Vipat
दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण नसून, समृद्धी, कृतज्ञता आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
हिंदू धर्मात दिवाळीच्या पाच मुख्य दिवसांना विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.
या दिवशी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृताचा कलश घेऊन समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. म्हणूनच हा दिवस आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने प्रजेला छळणाऱ्या आणि १६ हजार स्त्रियांना डांबून ठेवणाऱ्या नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
समुद्रमंथनातून प्रकट झाल्यानंतर याच दिवशी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंची पती म्हणून निवड केली होती. तसेच, १४ वर्षांचा वनवास संपवून भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह याच दिवशी अयोध्येत परतले होते.
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंच्या वामन अवताराने दानशूर पण अहंकारी राजा बळीचा पराभव करून त्याला पाताळात पाठवले होते. बळीच्या औदार्यामुळे भगवान विष्णूंनी त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याचा वर दिला. तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.
या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला होता. यमुनेने त्याचे आदरतिथ्य करून त्याला टिळक लावले. प्रसन्न होऊन यमराजाने वर दिला की, "या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल आणि जो भाऊ बहिणीच्या घरी जेवेल, त्याला अकाली मृत्यूची भीती राहणार नाही.