Make Sticky Traps At Home: घरच्या घरी बनवा चिकट सापळे! फवारणीशिवाय किडींचे सोपे नियंत्रण

Swarali Pawar

फवारणीशिवाय किडींचा बंदोबस्त!

प्रत्येक वेळी कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे नसते. घरच्या घरी चिकट सापळे बनवूनही अनेक किडींचे नियंत्रण करता येते.

Homemade Sticky Trap | Agrowon

चिकट सापळ्यासाठी काय लागेल?

पिवळा किंवा निळा कार्डबोर्ड, फोम शीट किंवा टीनचा पत्रा वापरा. त्यावर ग्रीस, वंगण किंवा कोणतेही चिकट तेल लावा.

Homemade Sticky Trap | Agrowon

सापळा कसा तयार कराल?

साधारण १५ × ३० सेंमी आकाराचा तुकडा घ्या. त्यावर ग्रीस लावले की चिकट सापळा तयार होतो.

Homemade Sticky Trap | Agrowon

पिवळा सापळा कोणासाठी?

मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांना पिवळा रंग आकर्षित करतो. त्यामुळे या किडींच्या नियंत्रणासाठी पिवळा सापळा वापरा.

Homemade Sticky Trap | Agrowon

निळा आणि पांढरा सापळा

निळा सापळा फुलकिडे आणि लीफ मायनरसाठी उपयुक्त आहे. पांढरा सापळा उडद्या भुंगेरे आणि काही ढेकूणवर्गीय किडींसाठी वापरला जातो.

Homemade Sticky Trap | Agrowon

सापळे कुठे लावाल?

सापळे पिकापासून १ ते १.५ फूट उंचीवर लावा. ते पिकापासून साधारण २० सेंमी अंतरावर असावेत.

Homemade Sticky Trap | Agrowon

पावसाळ्यात ही काळजी घ्या

पावसात ग्रीस निघू शकते, त्यामुळे सापळे झाकून ठेवा किंवा काढून ठेवा. वेळोवेळी स्वच्छ करून पुन्हा ग्रीस लावायला विसरू नका.

Homemade Sticky Trap | Agrowon

कमी खर्चात प्रभावी उपाय

टीनचा पत्रा किंवा फोम शीट पुन्हा पुन्हा वापरता येतो. म्हणून घरच्या घरी तयार केलेले चिकट सापळे किफायतशीर आणि उपयुक्त ठरतात.

Homemade Sticky Trap | Agrowon

Crop Damage: मुसळधार पावसानंतर पिकांची घ्या काळजी! नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय

Agrowon
अधिक माहितीसाठी..