Crop Damage: मुसळधार पावसानंतर पिकांची घ्या काळजी! नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय

Swarali Pawar

नुसता निचरा नको

अतिवृष्टीनंतर फक्त पाण्याचा निचरा करून थांबू नका. वेळीच पिकांची पाहणी केल्यास मोठे नुकसान टाळता येते.

Crop Care After Rain | Agrowon

सर्वप्रथम हे तपासा

शेतात पाणी साचले आहे का, माती वाहून गेली का ते पाहा. मुळे उघडी पडली, रोपे आडवी झाली किंवा पाने पिवळी पडली का, हेही त

Crop Care After Rain | Agrowon

पाण्याचा निचरा करा

शेतात पाणी जास्त वेळ साचू देऊ नका. चर काढून किंवा उपलब्ध साधनांनी पाणी त्वरित बाहेर काढा

Crop Care After Rain | Agrowon

घाईत शेतात उतरू नका

जमीन खूप ओली असेल तर ट्रॅक्टर किंवा यंत्र वापरणे टाळा. जमीन वाफशावर आल्यानंतरच पुढील कामे सुरू करा.

Crop Care After Rain | Agrowon

आंतरमशागत नक्की करा

वाफसा आल्यानंतर निंदणी आणि उथळ कोळपणी करा. यामुळे माती मोकळी राहते, तण कमी होतात आणि मुळांना हवा मिळते.

Crop Care After Rain | Agrowon

खतांचे नियोजन करा

जास्त पावसामुळे नत्र, पालाश आणि इतर अन्नद्रव्ये वाहून जाऊ शकतात. पिकातील कमतरतेची लक्षणे पाहूनच पुढील खतांचा निर्णय घ्या.

Crop Care After Rain | Agrowon

कीड-रोगांवर लक्ष ठेवा

दमट हवामानात मुळकुज, खोडकुज आणि पानांवरील रोग वाढू शकतात. पिवळे-निळे चिकट सापळे व कामगंध सापळे लावून नियमित निरीक्षण करा.

Crop Care After Rain | Agrowon

दररोज शेताची पाहणी करा

पावसानंतर काही दिवस पिकांवर विशेष लक्ष ठेवा. लक्षणे दिसताच तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करा.

Crop Care After Rain | Agrowon

Soybean Management: सोयाबीनमध्ये कीड-रोगांचा वाढता धोका; वेळेत करा हे उपाय

Agrowon
अधिक माहितीसाठी..