Anuradha Vipat
घरच्या घरी नैसर्गिक घटकांचा वापर करून मॉयश्चरायझर बनवणे अगदी सोपे आहे.
घरच्या घरी बनवलेले हे मॉयश्चरायझर त्वचेसाठी एकदम सुरक्षित असते
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यावर दुसरे लहान भांडे ठेवा. त्या लहान भांड्यात शिया बटर आणि खोबरेल तेल एकत्र करून मंद आचेवर वितळवून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या
थंड झालेल्या मिश्रणात कोरफडीचा गर टाका. चमच्याने हे मिश्रण चांगले फेटून घ्या. तयार मॉयश्चरायझर एका स्वच्छ हवाबंद डबीत भरून ठेवा
कोरफडीचा गर , ग्लिसरीन , गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल.
कोरफडीचा गर, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी एकत्र घ्या. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिश्रणात टाका. हे सर्व घटक चांगले मिसळून घ्या. हे मिश्रण डबीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
घरगुती मॉयश्चरायझरमध्ये कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाहीत.