Anuradha Vipat
घरच्या घरी हॉटेलसारखी चविष्ट आणि चटपटीत पनीर चिल्ली बनवणे खूप सोपे आहे.
पनीर, कॉर्नफ्लोर, मैदा, शिमला मिरची, कांदा, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिल्ली सॉस,टोमॅटो केचप, व्हिनेगर, काळी मिरी पावडर, तेल, मीठ, हिरवी कांदा पात.
कॉर्नफ्लोर, मैदा, थोडे मीठ, काळी मिरी पावडर आणि पाणी घालून मध्यम दाट पीठ भिजवून घ्या. पनीरचे तुकडे यात बुडवून गरम तेलात सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्या.
सोया सॉस, चिल्ली सॉस, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर एकत्र करून ठेवा. कढईत २ चमचे तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून हाय फ्लेमवर परता.
त्यात कांदा आणि शिमला मिरची घालून १-२ मिनिटे परता. तयार केलेला सॉसचा मिक्सर कढईत टाका.
अर्धा चमचा कॉर्नफ्लोर थोड्या पाण्यात मिसळून कढईत ओता, ज्यामुळे ग्रेव्हीला छान चकाकी आणि दाटपणा येईल.
शेवटी तळलेले पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. चवीनुसार थोडे मीठ घाला. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून गरमागरम पनीर चिल्ली सर्व्ह करा.