Mahesh Gaikwad
आजकालची तरूणाई चेहऱ्याच्या सौंदर्याबाबत अधिकच जागरूक झाली आहे. तरूणांमध्ये तेलकट आणि निस्तेज त्वचेची समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
चेहऱ्याचा तेलकटपणा घालविण्यासाठी लोक वारंवार चेहरा धुतात. परंतू यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक आणि आर्द्रता कमी होते.
चेहऱ्याची नैसर्गिक चमक आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता.
हा घरगुती उपाय तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने घरीच करू शकता. याचे साईड इफेक्टही होत नाहीत.
हा उपाय करण्यासाठी गुलाबजलमध्ये केसरच्या दोन-चार काड्या रात्रभर भिजवून ठेवा.
आता एका स्प्रे बॉटलमध्ये तांदळाच्या पाण्यात केसर टाका. आता या मिश्रणामध्ये दोन चमचे ग्लिसरीनही मिसळा. आशा प्रकारे तुमच्या चेहऱ्याचा ग्लो वाढविणारा घरगुती स्प्रे तयार झाला.
हा स्प्रे दिवसातून तीन-चारवेळा चेहऱ्यावर फवारा. यामध्ये असणारे घटक त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेची आर्द्रताही कायम राहते. तसेच चेहऱ्याचा काळपटपणा कमी होवून ग्लोसुध्दा वाढतो.
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर हा उपाय ट्राय करण्याआधी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.