Homemade Pizza Sauce : होममेड पिझ्झा सॉस कसा बनवावा? पास्ता आणि पिझ्झासाठी बेस्ट

Anuradha Vipat

'पिझ्झा सॉस'

घरीच हॉटेलसारखा चवदार आणि फ्रेश 'पिझ्झा सॉस' बनवणे अतिशय सोपे आहे.

Homemade Pizza Sauce | agrowon

केमिकलमुक्त सॉस

घरच्या घरी आपण अगदी ताज्या टोमॅटोपासून केमिकलमुक्त सॉस तयार करू शकतो. हा सॉस तुम्ही पिझ्झा आणि पास्ता दोन्हींसाठी वापरू शकता.

Homemade Pizza Sauce | agrowon

साहित्य

टोमॅटो, लसूण, कांदा,ऑलिव्ह ऑईल किंवा बटर,ओरेगॅनो ,चिली फ्लेक्स ,मिक्स्ड हर्ब्स,टोमॅटो केचअप,काश्मिरी लाल तिखट,काळी मिरी पावडर,मीठ आणि साखर.

Homemade Pizza Sauce | agrowon

कृती

सर्वप्रथम टोमॅटो धुवून घ्या. पातेल्यात उकळत्या पाण्यात हे टोमॅटो ३ ते ४ मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून मऊ प्युरी तयार करा.

Homemade Pizza Sauce | agrowon

सॉस शिजवणे

एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून परता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. यामध्ये टोमॅटो प्युरी टाका आणि सर्व मिश्रण मिक्स करा.

Homemade Pizza Sauce | agrowon

मसाले आणि हर्ब्स

प्युरीला उकळी आल्यावर त्यात काश्मिरी लाल तिखट, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स घाला.

Homemade Pizza Sauce | agrowon

टोमॅटो केचअप

चवीनुसार मीठ आणि टोमॅटोचा आंबटपणा संतुलित करण्यासाठी अर्धा चमचा साखर घाला. सर्वात शेवटी २ चमचे टोमॅटो केचअप टाका.मंद आचेवर हा सॉस ७ ते १० मिनिटे चांगला शिजू द्या,

Homemade Pizza Sauce | agrowon

Shevaya Kheer Recipe : कमी वेळात बनवा चवदार शेवयांची खीर: पाहुण्यांसाठी झटपट स्वीट डिश

Shevaya Kheer Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...