Homemade Pani Puri Recipe : तोंडाला पाणी आणणारी पाणी पुरी घरच्या घरी कशी बनवायची?

Anuradha Vipat

रेसिपी

घरच्या घरी चटपटीत आणि हायजिनिक पाणीपुरी बनवणे खूप सोपे आहे. बाहेरच्या गाडीवर मिळते तशीच चव येण्यासाठी खालील रेसिपी फॉलो करा.

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

तिखट पाणी साहित्य

१ कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, ४-५ हिरव्या मिरच्या, १ इंच आलं, १ चमचा चाट मसाला, १ चमचा काळं मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर आणि लिंबाचा रस.

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

कृती

हे सर्व साहित्य थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. नंतर त्यात गरजेनुसार थंड पाणी मिसळा आणि गाळून घ्या. वरून खारी बुंदी टाका.

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

गोड चटणी साहित्य

अर्धा कप चिंच, अर्धा कप गूळ आणि खजूर.

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

कृती

चिंच आणि खजूर पाण्यात उकळून घ्या. त्यात गूळ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून गाळून घ्या. यात चिमूटभर लाल तिखट आणि मीठ टाका. 

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

बटाटा-रगडा मसाला

उकडलेले बटाटे स्मॅश करा, त्यात उकडलेले पांढरे वाटाणे , चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ घालून एकत्र करा.

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

पुऱ्या

बाजारात मिळणाऱ्या 'रेडी टू फ्राय' पुऱ्या तळून घ्या किंवा रवा आणि मैद्याच्या घरी बनवलेल्या पुऱ्या वापरा.

Homemade Pani Puri Recipe | Agrowon

Naturally Ripened Mangoes : आंबे खायला आवडतात पण नैसर्गरित्या पिकलेले आंबे कसे ओळखाल?

Naturally Ripened Mangoes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...