Anuradha Vipat
केसांना पोषण देण्यासाठी आणि ते चमकदार बनवण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी तुम्ही घरीच नैसर्गिक हेअर सीरम बनवू शकता.
हे सीरम केसांमधील गुंता कमी करण्यास आणि फाटे फुटण्यापासून रोखण्यास मदत करते.
कोरफड जेल , खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल, गुलाब पाणी, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, लिंबाचा रस किंवा लॅव्हेंडर ऑइल.
एका वाटीत कोरफड जेल आणि तेल घेऊन ते चांगले फेटा. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल घाला.
मिश्रणात थोडे गुलाब पाणी घालून ते व्यवस्थित हलवून घ्या, जेणेकरून ते चिकट न राहता पातळ होईल.
हे मिश्रण एका लहान स्प्रे बाटलीत भरून ठेवा आणि केस धुतल्यानंतर वापरा.
केस धुतल्यानंतर, केस थोडे ओले असतानाच हे सीरम हातावर घेऊन केसांच्या टोकांना आणि लांबीला लावा.