Anuradha Vipat
मोमोजचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं.आजकालच्या यंग जनरेशनमध्ये फास्ट फूड खाणं हे क्रेझचं आहे.
चला तर मग आज आपण तोंडाला पाणी सोडणाऱ्या आणि खायला चविष्ट लागणाऱ्या मोमोजची साधी सोपी रेसिपी पाहूयात.
गव्हाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, मीठ ,पाणी , कांदा, कोबी, गाजर, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, आणि मिरी पावडर.
गव्हाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, मीठ एकत्र करून कणिक भिजवून घ्या.
बारीक चिरलेल्या भाज्या, कांदा, आले-लसूण पेस्ट, थोडे मीठ आणि मिरपूड एकत्र करुन मिश्रण तयार करा.
पिठाचे छोटे गोळे करा आणि त्यामध्ये सारण भरुन त्याला मोमोजचा आकार द्या.
पाणी उकळायला ठेवा. जाळीवर मोमोज ठेवा आणि १०-१५ मिनिटे वाफवून घ्या.