Immunity Boosting Vegetable Soup : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वाफाळलेले व्हेजिटेबल सूप, पाहा सोपी रेसिपी

Anuradha Vipat

प्रतिकारशक्ती

गरमागरम आणि वाफाळलेले व्हेजिटेबल सूप हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय आहे.

Immunity Boosting Vegetable Soup | Agrowon

संरक्षण

व्हेजिटेबल सूप सूप शरीराला अंतर्गत उष्णता देते आणि विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण करते.

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon

साहित्य

कोबी, गाजर, सिमला मिरची आणि ब्रोकोली , आलं-लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, चिमूटभर हळद, तेल किंवा बटर, चवीनुसार मीठ, व्हेजिटेबल स्टॉक, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्न फ्लोअर.

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon

पद्धत

तेल/बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेले आलं आणि लसूण टाकून १ मिनिट परतून घ्या. त्यात सर्व चिरलेल्या भाज्या घाला आणि मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे परतून घ्या.

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon

उकळी

भाज्या परतल्यानंतर त्यात २ कप पाणी, हळद, काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घाला. सूपला मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या.

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon

दाटपणा

सूप थोडे हॉटेलसारखे दाट हवे असल्यास, यात कॉर्न फ्लोअरची पेस्ट घाला आणि २ मिनिटे उकळा.

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon

सर्व्ह करा

गॅस बंद करा. वरून ताजी कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळा. तुमचे वाफाळलेले इम्युनिटी बुस्टर व्हेजिटेबल सूप तयार आहे.

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon

Monsoon Fashion : पावसाळ्यात ट्रेंडी लुकसाठी शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप्स कसे स्टाईल करावे?

Monsoon Fashion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...