Anuradha Vipat
बदलत्या हवामानात शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे.
बाजारात मिळणाऱ्या महागड्या सप्लीमेंट्सपेक्षा घरच्या घरी नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला हर्बल टी हा एक सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.
हर्बल टी केवळ तुमची प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत, तर शरीराला डिटॉक्स करण्यासही मदत करतात.
तुळस आणि आले यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि घशातील खवखव झटपट दूर करतात.
दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, तर लवंग शरीरातील इन्फेक्शन आणि जळजळ कमी करते.
हळद हे नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. हा चहा रोगप्रतिकारशक्ती अत्यंत वेगाने वाढवतो आणि सांधेदुखीवर गुणकारी आहे.
हा चहा पचनक्रिया सुधारतो, मानसिक तणाव कमी करतो आणि शरीराला ताजेतवाने करतो.