Homemade Ghee Secret Tips : तूप परफेक्ट बनवायचं आहे ? 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो

Anuradha Vipat

कला

घरच्या घरी रवाळ, सुगंधी आणि पिवळधमक साजूक तूप बनवणे ही एक कला आहे.

Homemade Ghee Secret Tips | agrowon

सिक्रेट टिप्स 

अनेकदा तूप जळते किंवा त्याला हवा तसा दाणेदारपणा येत नाही. परफेक्ट तूप बनवण्यासाठी या ५ सिक्रेट टिप्स नक्की फॉलो करा.

Homemade Ghee Secret Tips | agrowon

साय

दुधावरची साय साठवताना ती नेहमी फ्रीजरमध्ये ठेवावी, जेणेकरून तिला आंबट वास येणार नाही.

Homemade Ghee Secret Tips | Agrowon

लोणी

लोणी काढल्यानंतर ते थंड पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावे. लोण्यातील ताकाचा अंश पूर्णपणे निघून गेल्यामुळे तूप जास्त काळ टिकते .

Homemade Ghee Secret Tips | agrowon

 मंद आचेवर

तूप नेहमी जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर कढवावे. मध्यम किंवा मोठ्या आचेवर तूप कढवल्यास ते लवकर जळते.

Homemade Ghee Secret Tips | Agrowon

रवाळ

तूप पूर्णपणे कढत आल्यावर त्यात पाण्याचे दोन-तीन थेंब शिंपडा. यामुळे तूप थंड झाल्यावर छान रवाळ आणि दाणेदार होते.

Homemade Ghee Secret Tips | agrowon

सुगंध

तूप कढवताना त्यात १-२ लवंगा, दालचिनीचा छोटा तुकडा किंवा विड्याचे पान टाकावे.

Homemade Ghee Secret Tips | Agrowon

Water Bottle Cap Meaning : पाण्याच्या बाटल्यांवरील वेगवेगळ्या रंगांच्या झाकणाचा आर्थ काय

Water Bottle Cap Meaning | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...