Anuradha Vipat
किडनी हा आपल्या शरीराचा नैसर्गिक फिल्टर आहे, जो रक्तातील घाण, अतिरिक्त क्षार आणि विषारी घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम करतो.
चुकीचा आहार, कमी पाणी पिणे किंवा मानसिक ताणामुळे किडनीवर लोड येतो.=
रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून साखर न घालता पिणे फायदेशीर ठरते.
कोथिंबीर लघवीचे प्रमाण वाढवण्यास आणि किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
क्रॅनबेरी ज्यूस लघवीच्या मार्गातील संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो.
बीट आणि गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे रस शरीरातील युरिक ॲसिड आणि विषारी घटक बाहेर काढून किडनीचे फिल्टर साफ ठेवतात.
किडनी स्वच्छ ठेवण्याचा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे.