Dhaba Style Paneer Kofta : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर कोफ्ता करी

Anuradha Vipat

पनीर कोफ्ता

घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर कोफ्ता करी बनवण्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा. ही रेसिपी हॉटेलसारखी रिच आणि चविष्ट लागते.

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

साहित्य

किसलेले पनीर,मॅश केलेले बटाटे, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, कॉर्नफ्लोअर आणि मीठ.

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

कृती

वरील सर्व साहित्य एकत्र मळून त्याचे छोटे गोळे करा. गोळ्यांच्या मध्यभागी किसलेले काजू किंवा बेदाणे भरा. हे गोळे तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

 ग्रेव्ही साहित्य

कांदा, टोमॅटो, काजू , आले, लसूण, खडा मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि कसुरी मेथी.

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

ग्रेव्ही बनवण्याची पद्धत

कढईत तेल घालून कांदा, आले-लसूण आणि काजू परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. त्याची फाईन पेस्ट तयार करा. कढईत तेल किंवा लोणी गरम करा. त्यात खडा मसाला आणि तयार केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

मसाले

आता लाल तिखट, हळद आणि मीठ घाला. थोडे पाणी घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्या. शेवटी कसुरी मेथी आणि क्रीम .घाला

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

सर्व्ह

कोफ्ते कधीही ग्रेव्हीमध्ये टाकून उकळू नका, अन्यथा ते मऊ होऊन फुटतील. जेवताना ताटात आधी गरम ग्रेव्ही घ्या आणि वरून कोफ्ते ठेवून सर्व्ह करा.

Dhaba Style Paneer Kofta | Agrowon

Belly Fat Causes : जास्त खाल्ल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे येतं तुमचं पोट बाहेर

Belly Fat Causes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...