Chai Masala Recipe : मसाला चहा प्रेमींसाठी हिवाळा विशेष सिक्रेट चहा मसाला रेसिपी

Anuradha Vipat

'मसाला चहा'

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत गरमागरम, सुगंधी आणि कडक 'मसाला चहा' पिण्याची मजा काही वेगळीच असते.

Chai Masala Recipe | agrowon

साहित्य

वेलची ,लवंग ,काळी मिरी,दालचिनी सुंठ पावडर, जायफळ ,बडीशेप ,तुळशीच्या मंजिऱ्या किंवा वाळलेली पाने.

Chai Masala Recipe | agrowon

कृती

कढईत वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि बडीशेप एकत्र घाला. मंद आचेवर हे सर्व मसाले फक्त १ ते २ मिनिटे हलके परतून घ्या.

Chai Masala Recipe | agrowon

दळणे

मसाले पूर्ण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या कोरड्या भांड्यात टाका. त्यात आता सुंठ पावडर, किसलेले जायफळ आणि तुळशीच्या मंजिऱ्या मिक्स करा.

Chai Masala Recipe | agrowon

सिक्रेट चहा मसाला

तुमचा हिवाळा विशेष सिक्रेट चहा मसाला तयार आहे! हा मसाला एका काचेच्या कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा मसाला ४ ते ५ महिने अगदी सहज टिकतो.

Chai Masala Recipe | agrowon

फक्त पाव चमचा

२ कप चहा बनवताना चहापत्ती, साखर आणि दूध घालून चहा चांगला उकळू द्या. चहा पूर्ण तयार होत आला की सर्वात शेवटी फक्त पाव चमचा हा मसाला चहात टाका

Chai Masala Recipe | agrowon

चहाचा सुगंध

आधीच मसाला घातल्यास चहा कडू होऊ शकतो. शेवटी मसाला घातल्याने चहाचा सुगंध आणि चव अप्रतिम राहते.

Chai Masala Recipe | agrowon

Natural Hair Dye : नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी घरगुती हेअर डाय कसा बनवावा?

Natural Hair Dye | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...